“मी शरण येणार, पण सगळे आरोप सिद्ध करून दाखवणार” – रणजित कासलेंच्या व्हिडिओने कोणाची विकेट पडणार?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“मी शरण येणार, पण सगळे आरोप सिद्ध करून दाखवणार” – रणजित कासलेंच्या व्हिडिओने कोणाची विकेट पडणार?

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा धक्कादायक दावा; फरार असलेला निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले बीड पोलिसांना शरण येणार

 

 

मुंबई निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मोठ्या रकमांची ऑफर मिळाल्याचा दावा करणारे कासले आता शरण जाणार असल्याचे सांगत आहेत. “मी शरण येणार आहे, पण मी केलेले आरोप सिद्ध करून दाखवणार आहे”, असं म्हणत त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

 

कासले म्हणाले, “मी दररोज दोन गाड्या वापरून लोकेशन बदलत होतो, पोलिसांना पकडू दिलं नाही. पण आता जाणवलं की पळून काही होणार नाही. मी पत्रकार, वकील आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शरण जाण्याचा निर्णय घेतला.”

 

रणजित कासले यांचं म्हणणं आहे की, “माझ्यावर गुन्हे दाखल होणार आहेत, पण मी केलेले गंभीर आरोप खरे आहेत. मी कोणाला उघड केलं त्यांनाच आता भाजपमध्ये प्रवेश मिळतोय, आणि मीच बळी ठरणार.”

 

कासले यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा करत सांगितले की, “वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि ५० कोटींच्या ऑफर्स दिल्या गेल्या होत्या. राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते, हे मी सांगणार आहे.”

 

या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात आणि पोलिस खात्यात मोठी खळबळ माजली आहे. रणजित कासले खरोखरच शरण जातात की आणखी काही खुलासे समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

हॅशटॅग्स

#रणजितकासले #वाल्मिक

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...