ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्डवर फेरनियुक्ती; स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालकांकडून अभिनंदन
गोवा शिपयार्डच्या संचालकपदी पुन्हा निवड; संस्थेच्या कार्यक्षम नेतृत्वाची केंद्र शासनाकडून दखल
रत्नागिरी: गोवा शिपयार्ड लिमिटेड या भारत सरकारच्या संरक्षण खात्याअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमावर ॲड. दीपक पटवर्धन यांची स्वतंत्र संचालकपदी फेरनियुक्ती झाली आहे. भारत सरकारच्या कॅबिनेट सर्च समितीने संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार ही नियुक्ती केली असून, यापूर्वीही त्यांनी २०२१ ते २०२४ या कालावधीत या पदावर कार्य केले आहे.
तीन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोवा शिपयार्डनेच त्यांच्या फेरनियुक्तीची शिफारस केली होती. केंद्र शासनाच्या प्रक्रियेतील तपासणीनंतर त्यांची फेरनियुक्ती निश्चित झाली आहे.
या नियुक्तीबद्दल स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातर्फे ॲड. पटवर्धन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे यांनी “आमच्या अध्यक्षांची ही निवड ही संपूर्ण संस्थेसाठी गौरवाची बाब आहे,” असे सांगितले.
या वेळी संचालक प्रसाद जोशी, शरदचंद्र लेले, संतोष प्रभू, माधव गोगटे, मधुरा गोगटे, अजित रानडे तसेच व्यवस्थापक मोहन बापट व उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते.
#गोवा_शिपयार्ड #दीपकपटवर्धन #रत्नागिरी #स्वामीस्वरूपानंदपतसंस्था #संरक्षणखाते #सन्मान #Ferreniyukti #ShipyardDirector