ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; भारतात ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
२२ ते २४ एप्रिल दरम्यान देशभर दुखवटा; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली, जगभरातून शोकप्रतिक्रिया
नवी दिल्ली – ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर भारतात २२ ते २४ एप्रिलदरम्यान तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
पोप फ्रान्सिस यांनी रविवारी (२० एप्रिल) जगभरातील ख्रिश्चन समुदाय ईस्टर साजरा करत असताना शेवटचा सार्वजनिक संदेश दिला. या संदेशात त्यांनी म्हटले होते की, ‘‘धार्मिक, वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही. खऱ्या अर्थाने शस्त्रनाश केल्याशिवाय खरा शांततेचा मार्ग मिळू शकत नाही.’’
व्हॅटिकनच्या डोमुस सांता मार्ता निवासस्थानी पोप फ्रान्सिस यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती व्हॅटिकनचे कॅमेरलेन्गो कार्डिनल केविन फैरेल यांनी दिली. पोप यांना डबल न्यूमोनिया झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी आणि नवीन पोप निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
‘‘पोप फ्रान्सिस हे करुणा आणि नम्रतेचे प्रतीक होते. येशू ख्रिस्तांच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी मानवतेची सेवा केली,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
हॅशटॅग्स:
#PopeFrancis #RIP #NationalMourning #Christianity #Vatican #IndiaNews #PMModiTribute #GlobalLeader
फोटो