काताळे येथे पेहलगाम हल्ल्यातील शहिदांना ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा ग्रामपंचायतीकडून तीव्र निषेध; सरपंच प्रियांका सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
गुहागर – (सुजित सुर्वे) तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत काताळे येथे आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील पेहलगाव येथे दहशतवाद्यांनी देश-विदेशातील पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत झालेल्या भारतीय नागरिकांना ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.
या भावनिक कार्यक्रमात सरपंच सौ. प्रियांका सुर्वे, उपसरपंच श्री. प्रसाद सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य श्री. मधुकर अजगोलकर, पंचायत अधिकारी श्री. अशोक घडशी, कृषी सहायक श्री. विक्रम बाचकर, अंगणवाडी सेविका श्रीम. छाया सुर्वे, श्रीम. रितिका अजगोलकर, श्रीम. दर्शना येद्रे, श्रीम. फरिदा जांभारकर, अं. मदतनिस श्रीम. आरती शिरधनकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अमोल सुर्वे, श्री. दीपक बारस्कर व श्रीमती सोनाली पंडित हे उपस्थित होते.
हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. सरपंच प्रियांका सुर्वे, सदस्य मधुकर अजगोलकर आणि अधिकारी अशोक घडशी यांनी मनोगतातून या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हॅशटॅग्स:
#काताळे #पेहलगावहल्ला #श्रद्धांजली #गुहागरबातमी #देशभक्ती #दहशतवादविरोधात

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators