रत्नागिरीच्या तत्कालीन ZP CEO किर्ती किरण पुजार यांच्यावर चौकशीची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीच्या तत्कालीन ZP CEO किर्ती किरण पुजार यांच्यावर चौकशीची मागणी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; तक्रारदाराने मुख्यमंत्र्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी केली

बातमी
रत्नागिरी प्रतिनिधी – निलेश रहाटे

banner

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-खंडाळा गावात शौचालय बांधकामातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर ३४ महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे, तक्रारदार निलेश रहाटे यांनी राज्य सरकार, लोकायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली आहे.

रहाटे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना जिल्हा परिषदेच्या CEO कडून लेखी आश्वासन मिळाले, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. तत्कालीन जिल्हा परिषद CEO श्री. किर्ती किरण पुजार (सध्या धाराशिव जिल्हाधिकारी) यांनी “फौजदारी गुन्हा नोंद करू शकत नाही” असे लेखी उत्तर देत, पुरावे असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

विभागीय आयुक्त श्री. राजेश देशमुख, राज्य पाणी व स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभाग अधिकारी श्री. जायकर यांनी CEO यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली असल्याचे आरोप आहेत. RTI मार्फत मिळालेल्या माहितीत प्रशासनाची बेजबाबदारी उघड झाली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती अधिकारी व काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून, त्यामुळेच आजवर कारवाई टाळली गेली आहे. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हॅशटॅग्स:
#रत्नागिरी #जिल्हापरिषद #भ्रष्टाचार #स्वच्छभारत #शौचालययोजना #CEOपुजार #निलेशरहाटे #लोकायुक्त #DevendraFadnavis #KonkanNews

 

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

🔴 निलेश रहाटे 🔴 मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

Leave a Comment

आणखी वाचा...