डॉ. दत्ता विघावे यांची गगनभरारी: अंतराळात नोंदवले जाणार नाव, कार्य आणि ओळख!
रशियन ‘जिओस्कॅन’, ऑस्ट्रेलियन ‘ग्रिफिथ युनिव्हर्सिटी’ आणि अमेरिकन ‘नासा’कडून एकाच वेळी ऐतिहासिक गौरव; पाच विश्वविक्रम, डॉक्टरेट आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवलेले कार्य
अहिल्या नगर प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील….
रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅन २०२५ मध्ये वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून ‘सोयुझ रॉकेट’द्वारे शैक्षणिक उपग्रह ‘अल्फेरोव्ह २३९’ अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. विशेष म्हणजे, या उपग्रहात जगातील निवडक प्रतिभावंतांच्या नावांसह परिचय आणि फोटोही अंतराळात पाठवले जाणार आहेत. या सन्मानार्थ नावांमध्ये भारताचे सुपुत्र, बहु-पारगम्य व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही माहिती जिओस्कॅनने डॉ. विघावे आणि विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांना ई-मेलद्वारे दिली आहे.
तसेच, ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध ग्रिफिथ युनिव्हर्सिटीतर्फे २०२५ मध्ये ‘मिशन प्लॅटिपस’ अंतर्गत ४०० किमी अंतरावर शैक्षणिक क्यूबसॅट उपग्रह प्रक्षेपित केला जाणार असून त्यामध्येही निवडक जागतिक व्यक्तिमत्त्वांची नावे अंतराळात नोंदवली जाणार आहेत. त्यातही डॉ. विघावे यांचे नाव समाविष्ट असून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे माहितीस्त्रोत ठरणार आहेत.
याशिवाय, नासाच्या ‘इंटरनॅशनल ऑब्झर्व्ह द मून नाईट’ या उपक्रमात सहभागासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने डॉ. दत्ता विघावे यांना खास निमंत्रण दिले असून त्यांना सहभाग प्रमाणपत्रही पाठवले आहे.
मुळचे शिक्षक असलेले डॉ. विघावे हे एक कुशल क्रिकेट पंच, प्रशिक्षक, समीक्षक असून त्यांनी पर्यावरण, क्रिडा, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्य आदी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांच्या नावावर पाच विश्वविक्रम असून सहावा विक्रम केवळ काही पावलांवर आहे. क्रिकेटमधील कार्यासाठी अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे.
ते ‘युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पूल’चे सदस्य असून, ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड’च्या माध्यमातून त्यांनी वंचित घटकांपर्यंत गौरव पोहोचवला आहे. कोविड काळात समाजकार्य करत अनेकांना प्रेरणा दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवले गेलेले डॉ. विघावे मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प करून इतरांनाही प्रेरित करत आहेत. शिबीरे, रॅलीज, प्रशिक्षण वर्ग, व्यसनमुक्ती उपक्रम आणि ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवले आहे.
हॅशटॅग्स:
#DrDattVighave #SpaceRecognition #GeoscanRussia #GriffithUniversity #NASA #InternationalHonor #WorldRecords #MarathiPride #GlobalInspiration #VasudhaivaKutumbakam #Ratnagir