गुहागर तालुक्यातील कुंभवणे-आरेगाव मार्गावरील एस.टी. वाहतूक ठप्प – प्रवाशांचे हाल
मोऱ्यांचे काम रखडल्याने बस फेऱ्यांवर परिणाम, एस.टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान
आबलोली (संदेश कदम) –
गुहागर तालुक्यातील कुंभवणे ते आरेगाव या मार्गावर सध्या चालू असलेल्या मोऱ्यांच्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रा.प. गुहागर आगाराची एस.टी. बस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एस.टी. बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, काहींना रोजच्या प्रवासासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. या अनियमिततेमुळे एस.टी. महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे.
स्थानिक सुज्ञ नागरिक आणि प्रवाशांनी ठेकेदार व प्रशासनाकडे लवकरात लवकर मोऱ्यांचे काम पूर्ण करून नियमित एस.टी. वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.
#गुहागर #कुंभवणे #आरेगाव #STवाहतूक #प्रवासीहाल #रत्नागिरीबातम्या #konkannews