वेळणेश्वर येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेळणेश्वर येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

२८ एप्रिल रोजी विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्प येथे शिबिर; मोफत तपासण्या व वाहनसेवा उपलब्ध

आबलोली (संदेश कदम)
इंटरनॅशनल लॉंजेव्हिटी सेंटर इंडिया यांच्या आयोजनाखाली आणि घराडा केमिकल्स लिमिटेड यांच्या प्रायोजकत्वाखाली, बाई रतनबाई घराडा हॉस्पिटल, लवेल व साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वेळणेश्वर येथे जेष्ठ नागरिकांसाठी (वय ५५ वर्षांपेक्षा अधिक) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:३० या वेळेत विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्प, वेळणेश्वर, पिंपरी रोड, वदईच्या आधी, महावितरण सब स्टेशनच्या मागे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात रक्ततपासणी, ईसीजी, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी तसेच विविध रोग निदान मोफत करण्यात येणार असून पुढील उपचारांवर सवलती उपलब्ध असतील. सहभागी होण्यासाठी आधारकार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी सुशांत – ९५६१३२७८७३ आणि नंदकुमार – ७२७६६९५५४० यांच्याशी संपर्क साधावा.
शिबिरासाठी वेळणेश्वर पिंपर फाटा ते आश्रम या मार्गावर मोफत वाहनसेवा उपलब्ध आहे.

banner

#हॅशटॅग्स :
#वेळणेश्वर #गुहागर #आरोग्यतपासणी #मोफतशिबिर #जेष्ठनागरिक

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...