शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड | Chiplun Sports News
चिपळूणच्या शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सहभाग.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड
कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल प्रकारात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; सह्याद्रि शिक्षण संस्था व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे विशेष अभिनंदन
आबलोली (संदेश कदम) –
चिपळूण तालुक्यातील खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी बजावली आहे. अखिल भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संलग्न आचार्य नरेंद्र देव कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे २ मे ते ५ मे २०२५ या कालावधीत होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कबड्डी (मुले) प्रकारात कु. अमिश माने, कु. शिवराज पाटील आणि कु. सोहम मोरे, खो-खो (मुले) प्रकारात कु. चेतन पावरा, कु. सुबोध पोळ, कु. प्रफुल्ल वायकर व कु. तेजस भेलके, तर व्हॉलीबॉल (मुले) प्रकारात कु. सचिन पाटील आणि कु. प्रशांत साळुंके यांची निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष आमदार श्री. शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. हे विद्यार्थी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली च्या संघाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, विद्यापीठ संघातील एकूण ३० खेळाडूंमध्ये ९ खेळाडू शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे आहेत.
विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील व क्रीडा निर्देशक प्रा. सुहास आडनाईक यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.
—
हॅशटॅग्स:
#ChiplunNews #SharadchandraPawarKrushiMahavidyalaya #AkhilBhartiyaKrushiAnusandhanParishad #InterUniversitySports2025 #Kabaddi #KhoKho #Volleyball #KokanKrushiVidyapeeth #ChiplunSports #MaharashtraSports #StudentSucces