कुणबी गौरव चषक क्रिकेट स्पर्धा तळा शाखेच्या आयोजनात उत्साहात संपन्न
सानपाडा, नवी मुंबई येथे ३२ संघांच्या सहभागाने रंगलेली चुरशीची स्पर्धा; भोईरवाडी संघ विजेता
नवी मुंबई (संदीप शेमणकर) – कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका तळा यांच्या वतीने आयोजित मानाचा आणि सन्मानाचा ‘कुणबी गौरव चषक २०२५’ क्रिकेट सोहळा रविवार, २० एप्रिल रोजी सानपाडा, नवी मुंबई येथे शेकडो कुणबी बांधव आणि खेळाडूंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
शाखा अध्यक्ष यशवंत शिंदे, उपाध्यक्ष, पादाधिकारी व युवाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ व पुष्प अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि खिलाडूवृत्तीने सहभाग घेतला.
स्पर्धा सुरुवातीपासूनच अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरली. कुणबी गौरव चषक जिंकण्यासाठी प्रत्येक संघाने झुंज दिली. अखेरीस भोईरवाडी संघाने गौरव चषकावर आपले नाव कोरले, तर कुंबेट संघ द्वितीय, खैरट संघ तृतीय आणि वरळ संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरले.
विजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. सहभागी सर्व संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर आणि सुपर सिक्सर पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विठोबा भऊड आणि स्पर्धा प्रमुख नथुराम घाग यांचे विशेष योगदान लाभले. याशिवाय सर्व प्रायोजक, हितचिंतक, देणगीदार, पंच, गाव प्रतिनिधी, मंडळांचे पदाधिकारी आणि प्रेक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल तालुका तळा शाखेच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
हॅशटॅग:
#कुणबीगौरवचषक #क्रिकेटस्पर्धा #कुणबीसमाज #नवीमुंबई #सानपाडा #TalukaTala #क्रीडासोहळा #KBC2025 #RatnagiriNews