कोकणी फायटर क्रिकेट पनवेल आयोजित महापुरुष चषक २०२५चा पहिला पर्व जल्लोषात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणी फायटर क्रिकेट पनवेल आयोजित महापुरुष चषक २०२५चा पहिला पर्व जल्लोषात संपन्न

 

banner

विचुंबे, पनवेल येथे वाडीमर्यादित व खुल्या गटात १६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग; ब्राम्हणंदेव समृद्धी मोर्येवाडी व इलेव्हन स्टार सुखापूर विजेते

पनवेल (संदीप शेमणकर) – कोकणी फायटर क्रिकेट संघ, पनवेल यांच्या वतीने आयोजित महापुरुष चषक २०२५चा पहिला पर्व सोमवार, १४ एप्रिल रोजी श्री भैरवनाथ मैदान (माथाडी मैदान), विचुंबे, पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. वाडीमर्यादित व खुल्या गटात झालेल्या या स्पर्धेचे थेट युट्यूबवर प्रक्षेपणही करण्यात आले.

 

उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजनजी गोबरे, उपाध्यक्ष नितीन धुर्ये, सचिव लक्ष्मण घाडी, खजिनदार भूषण शिर्के, विनय सोयने व कार्यकर्ते रवी गोबरे, प्रमोद घाग, सचिन जाधव, सुरज गमरे, विनायक वजीरकर, राज धुर्ये, संतोष कदम, समीर पुळेकर, रमेश कांबळे, अमित गोबरे, रोहन पुळेकर, स्वप्नील गोबरे, अजय गोबरे, अक्षय चव्हाण, प्रमोद पालांडे, रोहन कदम, मनोहर मोर्ये, सुधीर पवार, विलास जंगम, मुन्ना जाधव, अक्षय वारंग, पवन पालांडे, ऋत्विक पालकर आदी उपस्थित होते.

 

“कोकणातील एक गाव, एक वाडी” या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. वाडीमर्यादित गटात ब्राम्हणंदेव समृद्धी मोर्येवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावून १५,००१ रुपये रोख व चषक जिंकला. बी एस सी सालपे बौद्धवाडी संघाने द्वितीय क्रमांक मिळवून १०,००१ रुपये रोख व चषक पटकावला.

 

खुल्या गटात इलेव्हन स्टार सुखापूर पनवेल संघाने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व चषक मिळवला, तर कोकणी फायटर क्रिकेट पनवेल संघाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावून रोख रक्कम व चषकाचा सन्मान मिळवला.

 

हॅशटॅग:

#महापुरुषचषक२०२५ #कोकणीफायटरक्रिकेट #पनवेल #क्रिकेटस्पर्धा #विचुंबे #KonkanCricket #YouthSports #SportsFestival

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...