पनवेल महानगरपालिकेकडून जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम राबवली; आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
नवी मुंबई (मंगेश जाधव) – दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल महानगरपालिकेने २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने हिवतापाविषयी जनजागृती करण्यात आली.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपले दवाखाने खुले ठेवत नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध आरोग्य जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.
हॅशटॅग
#पनवेलमहानगरपालिका #हिवतापदिन #जागतिकहिवतापदिन2025 #आरोग्यजनजागृती #पनवेलन्यूज