मुंब्र्यात दहशतवादाविरोधात संतापाचा उद्रेक; दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंब्र्यात दहशतवादाविरोधात संतापाचा उद्रेक; दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची मागणी

 

banner

काश्मीरमधील हल्ल्याने देशभरात संताप; मुंब्र्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात तीव्र प्रतिक्रिया

 

नवी मुंबई (मंगेश जाधव) :

काश्मीरमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. ‘दहशतवाद मुर्दाबाद, दहशतवाद्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी दहशतवाद्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला फाशी दिली आणि जोडे मारले. महिलांनीही चपलेचा हार घालून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

 

काश्मीरमधील बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश असून, त्यांच्या निधनामुळे डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. हा हल्ला मागील सहा वर्षांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला ठरला आहे.

 

या पार्श्वभूमीवर मुंब्रा शहरात आंदोलन झाले. आंदोलकांनी फलकांवर ‘दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरून मारा’ असे संदेश झळकावले. तसेच हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलकांनी सरकारकडे दहशतवादाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली. धर्माचा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

हॅशटॅग:

#मुंब्रा #दहशतवादविरोधीआंदोलन #काश्मीरहल्ला #राष्ट्रवादीकाँग्रेस #श्रद्धांजली #डोंबिवली #भारतविरोधातदहशतवाद

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


What do you like about this page?

0 / 400