पहलगाम मधील निर्घृण हल्ल्यातील पर्यटकांना मनसे गुहागरच्या वतीने श्रद्धांजली
शृंगारतळी येथील मनसे कार्यालयासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली; दहशतवाद्यांचा तीव्र निषेध
आबलोली (संदेश कदम)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे जिहादी दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या भीषण घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले असून, संपूर्ण देशभरातून या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्राच्या वतीने, तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शृंगारतळी येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी उपस्थित सर्वांनी मृतात्म्यांना शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली. कार्यक्रमादरम्यान गुहागर विधानसभा क्षेत्राचे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आणि सरकारने काश्मीरमधील हिंदू व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली.
यावेळी दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडवकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद कुष्टे, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, राहुल जाधव, प्रसाद विखांरे, रमेश जोशी, विश्वजीत पोदार, सुमित पवार, विकास जोशी, यश पालशेतकर, सतोश खाबे, मच्छिंद्र पडवळ, सुयोग्य कुबडे, विजय शिंदे, विवेक जानवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हॅशटॅग्स (Hashtags):
#मनसे #गुहागर #श्रद्धांजली #पहल्गामहल्ला #दहशतवादविरोधात #JammuKashmir #MNS #GuhagarNews #KashmirTerrorAttack