सावर्डे येथील कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली) ला एनबीए मानांकनाचा बहुमान
कोंकणातील पहिले डिप्लोमा फार्मसी कॉलेज ठरले एनबीए मानांकन प्राप्त करणारे; सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशात भर
तळवली (मंगेश जाधव) – सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली) या महाविद्यालयास नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रिडिटेशन (एनबीए), नवी दिल्ली यांच्याकडून २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीसाठी तीन वर्षांचे मानांकन प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, प्लेसमेंटची यशस्वी घडी, तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा याच्या आधारावर हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. कोंकण विभागातील एनबीए मानांकन प्राप्त करणारे हे पहिलेच डिप्लोमा फार्मसी कॉलेज ठरले असून, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री. शेखर निकम, सचिव श्री. महेश महाडिक आणि कॉलेज कमिटीच्या अध्यक्षा सौ. पुजाताई निकम यांनी प्राचार्य व सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
या यशस्वी मानांकन प्रक्रियेत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व माजी कर्मचारी असलेल्या आणि सध्या श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव यांच्या प्राचार्यपदी कार्यरत असलेल्या डॉ. वैशाली पाटील (महाडिक), तसेच रत्नागिरी येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. श्रीकृष्ण मस्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हॅशटॅग्स:
#NBAमानांकन #कॉलेजऑफफार्मसी #सह्याद्रीसंस्था #सावर्डे #चिपळूण #KonkanNews #PharmacyCollege