माजी सैनिक, वीर नारींसाठी मेळावे : 7 ते 9 मे दरम्यान खेड तालुक्यात आयोजन
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा उपक्रम; नोंदणी व समस्यांवर मार्गदर्शन
रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता-पित्यांसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे मेळावे खेड तालुक्यातील तीन ठिकाणी – 7 मे रोजी काढसिद्धेश्वर मठ, तांबट (खोपी), 8 मे रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स, आंबवली आणि 9 मे रोजी शिवतेज सेवाभावी संस्था, खेड येथे घेण्यात येणार आहेत.
या मेळाव्यांमध्ये पेन्शनसंबंधी मार्गदर्शन, अभिलेख कार्यालयातील अडचणींचे निराकरण, महासैनिक पोर्टलवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) यांसारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या सोबत डीस्चार्ज पुस्तक, पीपीओ ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ईसीएचएस कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल फोन अनिवार्यपणे आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व वीर नारी यांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
#माजीसैनिक #वीरनारी #सैनिककल्याण #रत्नागिरी #खेड #सेवामेळावा #सैनिकमेळावा #ZSWO
फोटो