मोगरे येथील आई भद्रकाली (भराडीन ) देवस्थान मंदिर तृतीय वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम
राजापूर – संदिप शेमणकर
राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील मोगरे राजवाडी पंचक्रोशीचे ग्राम दैवत, नवसाला पावणारी, जागृत देवस्थान, आई भद्रकाली (भराडीन ) देवीचा प्रती वर्षा प्रमाणे या हि वर्षी तृतीय वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी. मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थ, भाविकांच्या सहकार्याने संपन्न होत आहे.तरी या आनंदी सोहळा कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ, भाविकांनी सहकुटुंब – सहपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
कार्यक्रम –
सोमवार दिनांक 12 मे 2025
सकाळी 9.00 ते 11.00 वाजे पर्यंत श्री.गणेश पूजन, देवतास्थापन, महाआरती
सकाळी 11.30 ते 12.30 वा. पर्यंत – ताशा वाजंत्री
दुपारी 1.00 ते 3.00 वा. पर्यंत
भंडारा – महाप्रसाद
दुपारी 3.00 ते 5.00 वा. पर्यंत
महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
सायंकाळी 6.00 ते 8.00 वा. पर्यंत किर्तन किर्तनकार ह.भ.प.
गिरीजा करंबेळकर ( राजापूर )
रात्री. 10.00 वाजता भजनांचा
जंगी सामना (डबलबारी) खास आकर्षण
बुवा – श्री. संजय पवार ( डोंबिवली)
विरुद्ध
बुवा – श्री. विनोद चव्हाण ( कुडाळ)
आई भद्रकाली देवीच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. भद्रकाली भराडीन देवस्थान पंचक्रोशी समितीने केले आहे.
आपले स्नेहांकित
श्री. भद्रकाली (भराडीन) देवस्थान पंचक्रोशी