रिद्धी साळवी हिचे १२ वी विज्ञान शाखेतून उज्वल यश; ७२.३३% गुणांची कमाई
खोडदे गणेशवाडीतील रिद्धी हिने रत्नागिरीच्या अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजमधून साधले यश; सुयश कॉम्प्युटर सेंटरतर्फे गौरव
आबलोली (संदेश कदम) –
गुहागर तालुक्यातील खोडदे गणेशवाडी येथील कु. रिद्धी संतोष साळवी हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर १२ वी विज्ञान शाखेतून उज्वल यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या रिद्धीने ७२.३३% गुण मिळवून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे.
रिद्धीच्या या यशाचा गौरव करताना सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी आणि संचालिका सौ. सावी साळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपत तिला खास भेटवस्तू देऊन तिचा सत्कार केला. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणारे आहे.
हॅशटॅग्स:
#रिद्धी_साळवी #१२वीयशस्वी #गुहागर_गौरव #खोडदे_गणेशवाडी #विद्यार्थीप्रेरणा #RatnagiriVartaHar
फोटो