साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर अखेर कारवाई!
ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर तालुका प्रशासनाचे पाऊल, डॉक्टर सुनील दैठणकर यांची तात्पुरती बदली ; प्रकरण जिल्हा स्तरावर

बातमी – जितेंद्र चव्हाण प्रतिनिधि
लांजा तालुक्यातील साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दैठणकर यांच्यावर अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या तक्रारींची दखल घेत डॉ. दैठणकर यांनी आपला खुलासा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केला होता.
हा खुलासा तालुका आरोग्य अधिकारी लांजा यांनी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने प्राथमिक पातळीवर कारवाई करत डॉ. दैठणकर यांची साटवली आरोग्य केंद्रातून हलवणूक केली आहे.
या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पत्रकारांचे आणि विशेषतः ‘रत्नागिरी वार्ताहर डिजिटल‘चे आभार मानले आहेत, कारण ही बाब सर्वप्रथम उजेडात आणणारी बातमी या माध्यमाने प्रसिद्ध केली होती.
सामाजिक जागृती आणि स्थानिक पत्रकारितेच्या प्रभावामुळेच ही कारवाई शक्य झाली, असे स्थानिकांनी स्पष्ट केले. प्रकरण आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे असून पुढील निर्णय तिथून होणार आहे.
???? काय आहे मूळ बातमी ???? क्लिक करा
हॅशटॅग्स:
#साटवलीआरोग्यकेंद्र #डॉक्टरकारवाई #लांजातालुका #रत्नागिरीवार्ताहर #ग्रामस्थांचाविजय #लोकशक्ती
फोट