चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, २ जखमी
उत्तरकाशी जिल्ह्यात भीषण अपघात; बचावकार्य सुरू, यंत्रणा सतर्क
देहराडून: चारधाम यात्रेदरम्यान आज (गुरुवार) उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मोठा अपघात घडला. गंगोत्रीजवळ सात आसनी खासगी हेलिकॉप्टर कोसळलं असून या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
या अपघातातील हेलिकॉप्टर हे एरो ट्रिंक या खासगी कंपनीचे असल्याची माहिती मिळाली आहे. नाग मंदिराच्या खाली, भागीरथी नदीच्या काठी हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पोलीस, लष्करी जवान, आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची QRT टीम, १०८ रुग्णवाहिका तसेच तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अपघात कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.
हॅशटॅग्स:
#HelicopterCrash #Gangotri #ChardhamYatra #उत्तरकाशी #DehradunNews #AeroTrink #DisasterManagement
फोटो