गुहागर ता.२३ – कोकणात गणेश भक्तांना परतीच्या प्रवास सुखकर होण्सायासाठी तवसाळ पडवे (व्हाया कुडली बंदर वाडी) ते ठाणे पवई मार्गे अंधेरी जोगेश्वरी बोरिवली या ज्यादा गाडी ची मागणी गुहागार तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यानी रत्नागिरी मार्ग परिवहन महामंडळ चे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती, ती मागणी मान्य करुन दिनांक 13/09/2024, आणि दिनांक 15/09/2024 तसेच18/09/2024 रोजी ज्यादा गाडी सोडण्यात आली आहे. 13/08/2024आजपासून ऑनलाईन बुकींग साठी गाडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. असे आवाहन गुहागार तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. मिलिंद चाचे यांनी सर्व भक्तांना केल आहे
