???? पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घराजवळ मोठा स्फोट; पाकिस्तानची फायटर विमानेही भारताने पाडली
नवीदिल्ली– भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवून लावले आहे. भारतीय लष्कराचे तीनही दल पाकिस्तानला चोख उत्तर देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये पळापळ सुरु झाली आहे. भारतीय सैन्य पीओकेमध्ये 60 किलोमीटरमध्ये आत घुसले आहेत. पाकिस्तानची सात शहर भारताच्या निशाण्यावर आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक एफ 16 आणि जेएफ 17 विमानंही पाडण्यात आली आहेत.
परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आहे. एस.जयशंकर हे जगभरातील काही प्रमुख देशाशी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा करीत आहेत. भारताने पाकिस्तानचे अनेक क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानची हायटेक लढाऊ विमाने एफ-१६ आणि जेएफ-१७ भारतीय सैन्याने पाडली आहेत. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार केला जात आहे. असून, त्याला भारतचोख प्रत्युत्तर देत आहे. भारताच्या सीमावर्ती भागात विशेषत: राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट मोडवर आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानला जबरदस्त इशारा दिला. पाकिस्तानने कुरघोडी केल्या आहेत. पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला.
मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या सर्व हल्ल्यांना वेळेत प्रत्युत्तर देत त्यांना अपयशी ठरवले. सोमवारी रात्री अचानक जम्मूच्या आकाशात पाकिस्तानचे अनेक ड्रोन घिरट्या घालू लागले. त्यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. भारताच्या अत्याधुनिक S-400 डिफेन्स सिस्टमने हे सर्व ड्रोन हवेतच पाडले. जम्मूमध्ये सायरन वाजवून नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानने जम्मू विमानतळ, रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि आरएसपुरा भागात ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय यंत्रणांनी ते थोपवून धरले. याशिवाय, पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, जो देखील भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी अपयशी ठरवला. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे लक्षात येताच संपूर्ण भागात ब्लॅकआउट करण्यात आला. त्याचबरोबर पंजाबमधील अमृतसर आणि होशियारपूरमध्येही सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात आला.