???? अभिमानास्पद!
हळदीचा रंग अंगावर… लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान गेला सीमेवर!
‘ऑपरेशन सिंदूर’साठी नववधूने पाठवलं सौभाग्य; मनोज पाटील यांचा देशसेवेचा अभिमानास्पद निर्णय
पाचोरा (जळगाव) : लग्नाचा सडा आटलेला नाही, हळदीचा रंगही अंगावर शिल्लक… पण देशसेवेचं कर्तव्य मोठं असल्याचं उदाहरण जळगाव जिल्ह्यातील खेडगाव (नंदीचे) येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी घालून दिलं आहे. सोमवारी (५ मे) विवाहबद्ध झालेल्या मनोज यांना जम्मू-काश्मीरमधील तणावानंतर सैन्य दलाकडून तातडीने परत बोलावण्यात आलं आणि गुरुवारी (९ मे) ते सीमेवर रवाना झाले.
हळदीच्या रंगात रंगलेले हे सैनिक लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी देशाच्या रक्षणासाठी कर्तव्यावर गेले. पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांच्या कन्या यामिनी हिच्याशी मनोज यांचा विवाह झाला. सत्यनारायण पूजेचं नियोजन असताना ती रद्द करून मनोज यांनी आपल्या पत्नीसोबत निरोप घेतला.
या कठीण निर्णयावर मनोज यांच्या वडिलांनी “देशापेक्षा मोठं काही नाही, मुलाचा अभिमान आहे,” असं म्हणत त्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. नववधू यामिनीनेही “‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं सौभाग्य पाठवत आहे,” असे सांगत पतीच्या निर्णयाला साथ दिली.
मनोज पाटील २०१७ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले असून ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. देशसेवेच्या याच प्रेरणादायी उदाहरणामुळे संपूर्ण परिसरात त्यांचं कौतुक होत आहे.
#OperationSindoor #JawanOnDuty #JalgaonNews #ProudSoldier #देशसेवा #मनोजपाटील #IndianArmy #MarathiNews #WeddingToBorder
फोटो