मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सागरी विकास आढावा बैठक ; मालवण बंदर जेटी परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार
सिंधुदुर्गात सागरी योजनांचा आढावा, प्रवासी वाहतूक व सुशोभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
मालवण | मंत्री नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे झालेल्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आढावा बैठकीत आपल्या खात्याच्या योजनांचा तपशीलवार आढावा घेतला. जिल्ह्यातील सागरी विकासाच्या विविध योजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीदरम्यान मालवण बंदर जेटी परिसरात स्टॉल धारकांच्या दीर्घकालीन प्रलंबित समस्या सोडवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच बंदर परिसराचे सुशोभीकरण, मालवण-दांडी प्रोमिनाड विकसित करणे व खाडी अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
—
हॅशटॅग्स:
#NiteshRane #SagariVikas #MalvanBunder #SindhudurgDevelopment #DeepakKesarkar #NileshRane #CMOMaharashtra #DevendraFadnavis
फोटो