गुहागर – आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलने सलग १० वर्षाची १० वीच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंटअकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील
इयत्ता दहावी सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून सलग दहा वर्षे शाळेचा निकाल १००% लागत असून या इंग्लिश मिडीयम स्कूलने सलग १० वर्ष १० वीच्या १००%, निकालाची परंपरा कायम राखली आहे.या विद्यालयातून कुमारी. रिद्धी प्रकाश मांडवकर हिने
८३.४० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कुमार साहिल प्रदीप देसाई यांने ८१.००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर कुमार. वेदांत विजय पवार यांने ७५.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिनशेठ चंद्रकांत बाईत , सचिव सौ. स्नेहल सचिन बाईत , मुख्याध्यापक सौ. नेत्रा नरेंद्र रहाटे , शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.