विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्जांना २० मेपर्यंत मुदतवाढ
अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; समाज कल्याण विभागाचा पुढाकार
रत्नागिरी, ता. 14 : समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही शिष्यवृत्ती सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी असून परदेशात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे. अर्ज करण्यासाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “रोजगार” या लिंकला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारच्या या उपक्रमामुळे अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे खुली होत असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#शिष्यवृत्ती #परदेशातशिक्षण #समाजकल्याणविभाग #अनुसूचितजाति #नवबौध्दविद्यार्थी #रत्नागिरीबातमी
फोटो