स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यानात भास्करराव टोपे यांचा सन्मान
नाशिक : ( नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी)
वसंत व्याख्यानमाला, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यानानिमित्त अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ (नवी दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. भास्करराव टोपे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हा सन्मान ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना नेते श्री. छगनराव भुजबळ व बारा बलुतेदार संघटनांचे नेते श्री. अरुणभाऊ नेवासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. अनंतराव जांगजोड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व उपस्थित जनसमुदायाचे साक्षीने हा गौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भास्करराव टोपे साहेब यांनी आगामी संत नामदेव एकात्मता विश्व महासम्मेलनास शुभेच्छा दिल्या. पाच लाख नागरिकांच्या सहभागाने पार पडणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. “मी स्वतः या महासम्मेलनासाठी उपस्थित राहीन,” असे अभिवचनही त्यांनी दिले.
हा कार्यक्रम समाज एकात्मतेचा संदेश देणारा ठरला असून, सामाजिक समतेसाठी झटणाऱ्या सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.हा माहिती पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक श्री संतोष मुळे यांनी दिली