राजापुरात खळबळ: दारूच्या नशेत भाऊ आणि पुतण्याकडून तरुणाचा निर्घृण खून
नाटे ठाकरेवाडी येथे वाद विकोपाला; स्वप्नील ठाकरे यांचा मृत्यू, संशयितांविरोधात गुन्हा दाखल
बातमी… समिर शिरवाडकर
राजापूर (नाटे) – किरकोळ वादातून दारूच्या नशेत भाऊ आणि पुतण्याकडून ४५ वर्षीय स्वप्नील ठाकरे यांचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी नाटे, ठाकरेवाडी येथे घडली. या घटनेने राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्नील ठाकरे (वय ४५, रा. नाटे ठाकरेवाडी) हे सध्या रत्नागिरीत वास्तव्याला होते. गुरूवार, १५ मे रोजी ते आपल्या लहान मुलासह मूळगावी आले होते. रात्री त्यांनी मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे आणि पुतण्यासोबत मद्यप्राशन केले. त्यावेळी किरकोळ कारणावरून तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला आणि चंद्रकांत व त्यांच्या पुतण्याने स्वप्नील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाटे परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
हॅशटॅग्स:
#राजापूर #नाटेठाकरेवाडी #खून #गुन्हा #RatnagiriNews #MurderCase #CrimeNews
फोटो