एसटीचा प्रवास होणार ‘स्मार्ट’! ३ हजार स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, AI यंत्रणा; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एसटीचा प्रवास होणार ‘स्मार्ट’!
३ हजार स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, AI यंत्रणा; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

पुण्यातील स्वारगेट घटनेनंतर महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवाशांना दिलासा देणारी यंत्रणा सज्ज

नवी मुंबई (मंगेश जाधव) – राज्यातील एसटी प्रवास आता अधिक सुरक्षित, वेळेवर आणि तंत्रज्ञानस्नेही होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) तब्बल ३ हजार स्मार्ट बस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देत “एसटी महामंडळ नव्या युगात प्रवेश करत आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

पुणे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बस निर्मिती कंपन्यांच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. यावेळी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, विविध खातेप्रमुख व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


स्मार्ट बसमध्ये असतील ‘या’ सुविधा:

  • AI आधारित कॅमेरे व GPS – बस व चालकाच्या हालचाली ट्रॅक करणे शक्य
  • वाय-फाय आणि एलईडी टीव्ही – प्रवाशांसाठी मनोरंजन व शासकीय माहिती
  • ब्रेथ अनालायझर यंत्रणा – मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यावर नियंत्रण
  • अँटी-थेफ्ट लॉकिंग सिस्टिम – बस चोरीला आळा
  • ‘तिसरा डोळा’ प्रणाली – चालकाच्या ड्रायव्हिंग स्टाईलवर लक्ष
  • फोम बेस अग्निशमन यंत्रणा – आग लागण्याच्या घटनांवर प्रतिबंध

एकाच वेळी सुरक्षा, माहिती आणि महसूल वृद्धी

प्रत्येक स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले असून, पार्क असलेल्या बस पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. एलईडी पॅनलद्वारे प्रवाशांना मार्गदर्शक माहिती, सरकारी संदेश आणि जाहिराती दाखवल्या जातील. यामुळे प्रवाशांना अधिक माहिती मिळेलच, शिवाय एसटी महामंडळाच्या महसुलातही वाढ होणार आहे.


#एसटीस्मार्टबस #MSTCBusUpgrade #SafeTravel #SmartTransport #महाराष्ट्रपरिवहन #सुरक्षितप्रवास #AIबस #GPSबस #RatnagiriVartahar

फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...