Ratnagiri Crime:
रत्नागिरी लॉजवर पोलिसांचा छापा; महिलांना देहविक्रीसाठी आणल्याचे उघड, अरमान खानला अटक
वर्षभरानंतर पुन्हा उघड अनैतिक व्यापार; शहरात खळबळ
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा अनैतिक व्यापार उघडकीस आला असून खेडशी परिसरातील गौरव लॉजवर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 13 मे रोजी करण्यात आली असून या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून गौरव लॉजवर छापा टाकला. यामध्ये चार महिलांना देहविक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरमान खान याच्याविरोधात “अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956” अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळावरून महिलांना सोडवण्यात आले असून आरोपीच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. आरोपीला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वीही रत्नागिरीमध्ये असाच प्रकार समोर आला होता. पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने शहरवासीयांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे.
#RatnagiriCrime #रत्नागिरीपोलीस #UnethicalTrade #AnaitikVyapar #WomenTrafficking #HotelRaid #CrimeNews
फोटो