हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी

हुंडाबळी प्रकरणानंतर भाजप महिला आघाडी आक्रमक; कोर्ट परिसरात घोषणाबाजी, टोमॅटोफेक, चप्पलमार

बातमी – मंगेश जाधव 

पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळीप्रकरणात देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच, मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे यांना अखेर आज पहाटे अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. या अटकेनंतर भाजप शहर महिला आघाडीने शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आक्रमक आंदोलन छेडले.

 

आज दुपारी पोलिसांनी हगवणे पिता-पुत्रांना कोर्टात हजर केल्यानंतर, महिलांनी घोषणाबाजी करत त्यांच्यावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्या हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली आरोपींच्या पोस्टरवर चप्पलमार करत संतप्त महिलांनी न्यायाची मागणी केली.

 

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर कोर्टाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना २८ मेपर्यंत, म्हणजेच ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

हॅशटॅग्स :

#हगवणेप्रकरण #वैष्णवीहगवणे #हुंडाबळी #BJPमहिलाआघाडी #कोर्टआंदोलन #PoliceCustody #PuneNews #RatnagiriVartahar

 

फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...