तळवली येथे घरावरती वीज पडून नुकसान तळवली (मंगेश जाधव)

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली येथे घरावरती वीज पडून नुकसान तळवली (मंगेश जाधव)

पहाटेपासून सुरू असणाऱ्या वादळी वारा

पावसाने गुहागर तालुक्यातील तळवली येथील एका घरावरती वीज पडून घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख दहा हजार रुपयांचे मोठं नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

तळवली गावातील आनंद विठ्ठल भोळे व गणेश विठ्ठल भोळे हे भाऊ एकाच घरात राहत आहेत. एक घर असल्याने दोघांची घरपट्टी ही वेगळी आहे एकाच वेळी एकाच घरावरती वीज पडल्याने दोन्ही कुटुंबातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आनंद भोळे यांचे 3लाख 5 हजार रुपयाचे तर त्यांचे बंधू गणेश भोळे यांचे 2 लाख 5 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून एकूण पाच लाख दहा हजार रुपयाची इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पंचनामा जागीच करण्यात आला आहे.

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...