मुसळधार पावसाचा फटका : दरड कोसळून घराची भिंत उद्ध्वस्त, ५० हजारांचे नुकसान
साटवली मुस्लिमवाडीतील तय्यब बरमारे यांच्या घरात दरड घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली
लांजा (जितेंद्र चव्हाण प्रतिनिधि) .
तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने साटवली मुस्लिमवाडी येथे एक घर धोक्याच्या स्थितीत आणले आहे. सोमवारी २६ मे रोजी पहाटे पावसामुळे दरड कोसळून तय्यब जैनुद्दीन बरमारे यांच्या घराची भिंत पूर्णपणे कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे दरवाजे, भिंती, फ्रिज व अन्य साहित्याचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
२६ मेच्या पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी आणि चिखलसाचं साम्राज्य पसरलं असून दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बरमारे यांच्या घरात घुसलेल्या दरडीमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच साटवली ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिक प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#लांजा #साटवली #दरडकोसळली #पावसाचानुकसान #रत्नागिरीवार्ताहर #MaharashtraRain #DisasterNews #RatnagiriNews
— रत्नागिरी वार्ताहर