???? फेरफार नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेताना मंडणगडमधील मंडळ अधिकारी, तलाठी व शिपाई रंगेहाथ पकडले!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; महसूल विभागात खळबळ
रत्नागिरी – मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथील शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे महसूल खात्यात मोठी खळबळ उडाली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे शेणाळे येथे लिलावातून शेतजमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार नोंद करून सातबारा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना संबंधित शिपाई मारुती भोसले याने ५० हजारांची लाचेची मागणी केली. त्यातील ४५ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारल्यानंतरही फेरफार नोंद न केल्याने तक्रारदाराने थेट संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मंडळ अधिकारी अमित शिवगण, तलाठी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई भोसले यांनी फेरफार मंजुरीसाठी पुन्हा ३० हजारांची लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा रचून हे तिघेही लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.
ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक फौजदार उदय चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक अबिकर, कॉन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार व वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली.
—
???? हॅशटॅग्स:
#मंडणगड #लाचलुचपत #रत्नागिरी #फेरफारनोंद #महसूलखात्यातीललाचखोरी #ACBAction #RatnagiriNews #MarathiNews
—
????️ फोट