*”आम्ही कोकणस्थ”पालशेत संस्थेच्या वतीने पालशेत गावातील २७० ग्रामस्थांना प्रथमोपचार पेटीचे वाटप..!*
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील”आम्ही कोकणस्थ” पालशेतचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास मदन साळवी यांच्यावतीने पालशेत गावातील २७० ग्रामस्थांना प्रथमोपचार पेटीचे वाटप नुकतेच करण्यात आले. सदर प्रथमोपचार पेटी वाटप कार्यक्रम पालशेत हायस्कूल हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बापट उपस्थित होते. तसेच रवींद्र कानिटकर, आरोग्यसेविका अंकिता पालकर, नाना पालकर,निलेश विखारे, श्रीकांत फणसे ,”आम्ही कोकणस्थ” संस्थेचे अध्यक्ष गुरुदास साळवी उपस्थित होते.
यावेळी पालशेत मधील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांनाही प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले. यावर्षी आम्ही कोकणस्थ पालशेतच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये एकूण १७४ ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला तसेच चांगल्या प्रतीचे ७० मोफत देण्यात आले. यावेळी आम्ही कोकणस्थ” संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास साळवी यांनी सांगितलं की, या संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला, जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याने या संस्थेचे काम चालू आहे यापुढे आपण ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी जे जे करणे शक्य आहे ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सावंत यांनी केले तर शेवटी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे अध्यक्ष गुरुदास साळवी यांनी आभार मानले.