भारतीय नाविक सेना युनियनच्या रौप्य महोत्सवाचे भव्य आयोजन
गडकरी, राणे, शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मनोरंजनाचा विशेष कार्यक्रम
भरत माने (साखरपा )
भारतीय नाविक सेना युनियनच्या रौप्य महोत्सव (२५व्या वर्धापन दिन) निमित्ताने एक भव्य समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ६ जून रोजी, शुक्रवार सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
या विशेष समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यासोबतच विशेष अतिथी म्हणून बी.एस. टीका, कॅ. नरेन भट्ट, कॅ. के.एस. पेंटल, कॅ. दिपक कुरिया, आणि कॅ. संजय भावनानी यांचाही समावेश आहे.
या कार्यक्रमात आकर्षक असा मनोरंजनाचा भागही असणार आहे. भारतीय नाविक सेना युनियनने मागील २५ वर्षांमध्ये जहाज उद्योगातील कामगारांच्या हक्कासाठी मोठे योगदान दिले आहे. नवोदित तरुणांना रोजगाराच्या संधी, सामाजिक कार्यामधील सहभाग, तसेच शालेय साहित्य वाटप यांसारख्या उपक्रमांद्वारे संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या दैदीप्यमान प्रवासाच्या स्मरणार्थ आयोजित या समारंभाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रवींद्र बाईंग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळस्कर, आणि सेक्रेटरी नंदकुमार बाईंग विशेष प्रयत्न करत आहेत.
—
#भारतीयनाविकसेना #रौप्यमहोत्सव #नितीनगडकरी #नारायणराणे #एकनाथशिंदे #मुंबईइव्हेंट #शिपिंगयुनियन #समाजकार्य















