लांजा बसस्थानकासमोर भीषण अपघात, बसची वृद्धास धडक; दोन्ही पाय जायबंदी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 लांजा बसस्थानकासमोर भीषण अपघात – बसची वृद्धास धडक; दोन्ही पाय जायबंदी!

लांजा  (वार्ताहर )| लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. एसटी बसची धडक बसल्याने एका वृद्ध व्यक्तीचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसच्या धडकेत घडली. गंभीर जखमी वृद्धाला तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.


#BreakingNews #LanjaAccident #STBusAccident #RatnagiriNews #EmergencyAlert #BusStandIncident #LanjaLive

????️ फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...