???? ‘समृद्धी’ महामार्गाचा अखेरचा टप्पा ५ जूनला प्रवाशांसाठी खुला!
इगतपुरी-आमणे टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई | अखेर ‘समृद्धी’च्या प्रवासाला पूर्णत्व येत आहे! नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील अखेरचा टप्पा – इगतपुरी ते आमणे (७६ किमी) – याचे लोकार्पण गुरुवार, ५ जून २०२५ रोजी होणार असून, याच दिवशी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका भव्य कार्यक्रमात या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून साकारलेला ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांतील अंतर १६ तासांवरून फक्त ८ तासांवर घेऊन आला आहे.
आत्तापर्यंत नागपूर ते इगतपुरी असा ६२५ किमीचा टप्पा प्रवाशांसाठी खुला होता. एप्रिल २०२५ मध्ये उर्वरित इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, ५ जूननंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी पूर्णतः उपलब्ध होणार आहे. याबाबत MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
—
#SamruddhiMahamargh #DevendraFadnavis #MSRDC #NagpurToMumbai #इगतपुरीआमणे #समृद्धीमहामार्ग #MaharashtraDevelopment #HighwayLaunch #InfrastructureIndia
????️ फोटो