डाॅ. किशोर पाटील यांना ‘राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४’ प्रदान
हिंदी पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवंडीतील कार्यक्रमात गौरव
भिवंडी (गुरुदत्त वाकदेकर) : हिंदी पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंदभूमी टाइम्सचे संपादक तथा समाजसेवक यूसुफ मन्सूरी यांच्या वतीने २०२४ मध्ये विविध सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार भिवंडी येथील धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डाॅ. किशोर बळीराम पाटील यांना “राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हिंदभूमी टाइम्सचे संपादक तथा समाजसेवक यूसुफ मन्सूरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, वकील व इतर मान्यवरांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करणे, तसेच समाजात सकारात्मक कार्याची प्रेरणा प्रसारित करणे हा होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, माजी नगरसेवक वसीम अंसारी, समाजसेवक अकरम मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक अनंता वाघ, वकील खदीजा खान (मुंबई उच्च न्यायालय), मुख्याध्यापिका माहेनूर खान यांची उपस्थिती लाभली होती. तसेच पत्रकार क्षेत्रातील डाॅ. किशोर बळीराम पाटील (संपादक, दै. स्वराज्य तोरण), फिरोज मेमन, अमृत शर्मा, आचार्य सुरजपाल यादव, संदीप गुप्ता, सोहेल अंसारी, सय्यद नकी हसन यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी केले.
हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.