गुहागर तालुक्यातील पेवे गावची सुकन्या कु. ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिचे बीएससी आयटी परिक्षेत घवघवीत यश
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. १३, मौजे पेवे (गाव शाखा) या धम्म संघटनेचे माजी अध्यक्ष व पेवे विभाग क्र. २ चे माजी विभाग अधिकारी प्रशांत रामचंद्र जांबुर्गेकर यांची सुकन्या कु. ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिने चिपळूणच्या गुरुकुल महाविद्यालयामधून पंधरावीच्या (बीएससी आयटी ) परीक्षेत महाविद्यालयमधून ९७ % गुण मिळवून संपूर्ण महाविद्यालयमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिच्या या घवघवीत यशामुळे बौद्ध समाजासह सर्वच सामाजिक स्तरातून तीचे, तीच्या आई – वडिलांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत असून कु. ईशा हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत