???? हुंडाबळी थांबवण्यासाठी मराठा समाजाचं धाडसी पाऊल!
लग्नात डीजे, प्री-वेडिंग, फाजील खर्चावर आळा; नवी ‘आचारसंहिता’ लागू
नवी मुंबई (मंगेश जाधव) | वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशा धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर हुंडा, फाजील खर्च आणि विकृतीला आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजाने ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. समाजाने विवाह सोहळ्यांसाठी विशेष ‘आचारसंहिता’ जाहीर केली असून, याच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे.
—
???? आचारसंहितेत काय काय?
हुंडा घेऊ नका – देऊ नका!
डीजे आणि प्री-वेडिंगला पूर्ण बंदी
लग्न सोहळा केवळ 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा
हार घालताना वर उचलण्यास मज्जाव
कर्ज काढून लग्नाचा खर्च करू नये
दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांवर बंदी
वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत
भेटवस्तूऐवजी पुस्तके, रोपे किंवा रोख अहेर द्यावा
देखावा व फाजील खर्च टाळावा
मुलीच्या नावावर एफडी करण्याचा पर्याय
जेवणात फक्त ५ पदार्थ
साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करण्याचा सल्ला
—
???? आचारसंहितेचं पालन करणाऱ्यांचा सन्मान
आचारसंहितेचं पालन करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार केला जाणार आहे. यामुळे समाजात सकारात्मक स्पर्धा निर्माण होणार आहे.
—
???? ११ जणांची सुकाणू समिती
या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ११ सदस्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुकावार समित्यांमार्फत ही संहिता सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांचा सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
—
???? समाजात परिवर्तनासाठी प्रत्येकाचं योगदान आवश्यक!
हुंडाबळी रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील युवकांच्या विवाह समस्या सोडवण्यासाठी ही पावलं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. समाजातील प्रत्येकाने या बदलासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
—
???? हॅशटॅग्स:
#हुंडाबळी #मराठासमाज #लग्नआचारसंहिता #DowryFreeMarriage #SocialReform #MarathaUnity #PreWeddingBan #SimpleMarriage
—
???? फोटो