???? एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा!जूनपासून ५३% महागाई भत्ता, अपघाती विमा आणि मोफत प्रवास पासाची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जून २०२५ पासून एसटी कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्यात येणार असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास १२ महिन्यांसाठी देण्यात येईल.
सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयांची घोषणा केली. यावेळी त्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यांपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिला असल्याचेही सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “एसटी ही सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी आहे. त्यामुळे सेवा दर्जा सुधारण्यासाठी तसेच बसस्थानकांची स्वच्छता, विश्रांतीगृह यांची चोख व्यवस्था आवश्यक आहे. एसटीमधून कार्गो सेवा सुरू करून उत्पन्नवाढीचे मार्गही शोधावेत.”
महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निधीच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ मिळणार आहेत.
—
???? महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे :
✅ महागाई भत्ता ५३% (जून २०२५ पासून)
✅ १ कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच
✅ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांसाठी मोफत पास
✅ दोन वैद्यकीय योजनांपैकी एक निवडण्याचा पर्याय
✅ बससेवा व स्थानक स्वच्छतेसाठी प्राधान्य
—
???? #STNews #EknathShinde #महागाईभत्ता #एसटीकर्मचारी #MaharashtraNews #TransportUpdate #BreakingNews
—
????️ फोटो