उदय सामंत आमदार पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली: जिल्हा परिषदेचा अधिकाऱ्यांकडून मेल मिळालाच नाही, असा हास्यास्पद दावा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उदय सामंत आमदार पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली: जिल्हा परिषदेचा अधिकाऱ्यांकडून मेल मिळालाच नाही, असा हास्यास्पद दावा!

 

रत्नागिरी | प्रतिनिधी निलेश रहाटे

वाटद मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून तक्रारदाराकडून संबंधित कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. न्याय मिळवण्यासाठी अनेक संबंधित विभाग व आमदार पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाशी २५ महिने घोटाळा बाबत पत्रव्यवहार करण्यात आला . अखेर, मंत्री महोदयांनी २५ महिन्यानी वेळात वेळ काडून तक्रारीची गंभीर दखल घेत २१ फेब्रुवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसाठी आदेश दिले.व त्याचा अहवाल मंत्री महोदय च्या कार्यालयात देण्यात यावा. पण नेहमी प्रमाणे च जिल्हाधिकारी नी हात वर करून मंत्रीमहोदय हयाचा मेल

सदर मेल जिल्हा परिषदेच्या CEO च्या ईमेल आयडी वर फॉरवर्ड करण्यात आला ( जे ३ वर्ष भ्रष्टाचार करणाऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत ) याची स्पष्ट नोंद अधिकृत कागदपत्रात आहे. सुस्त प्रशासन ला RTI टाकल्यावरच कामा ला हात लावतात व त्याच माहिती च्या आधारे रेटून खोट बोलणारे अधिकारी आश्चर्य म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरीचे कार्यालय ग्रा. पं विभाग म्हणते की, वरून” *मेल मिळालाच नाही”!*

 

हा प्रकार पाहता आमदार पालकमंत्र्यांच्या आदेशालाही गांभीर्याने घेतले जात नाही, ही बाब स्पष्ट होते.तर सामान्य नागरिकांचे काय. जिल्हाधिकारी कार्यालयाने फॉरवर्ड केलेला मेल खुद्द तक्रारदाराने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दाखल केला होता, तरीसुद्धा “मेल मिळाला नाही” असे उत्तर देणे, ही नागरिकांच्या भावना व प्रशासकीय उत्तरदायित्वाची थट्टा आहे.

 

हा प्रकार संबंधित विभाग व अधिकाऱ्यांकडून घोटाळेखोरांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा स्पष्ट संकेत देतो. एकीकडे शासन स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे, तर दुसरीकडे या योजनांतील घोटाळ्यांकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.

 

या प्रकरणाची तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, जेणेकरून दोषींवर कठोर कारवाई होईल आणि सामान्य नागरिकाच्या न्यायाच्या लढ्याला न्याय मिळेल त्याच बरोबर पालकमंत्री आमदार हयांना सुद्धा न्याय मिळेल.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...