सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा

आबलोली (संदेश कदम) 

दुस-यांच्या सुख – दु:खात धावून जाणारे गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा ४१ वा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व सर्व मनसे कार्यकर्त्यांनी जानवळे जि. प.शाळा नं. १ या ठिकाणी सुपारी झाडांचे वृक्षारोपण केले.त्याचबरोबर गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.गुहागर तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात संध्याकाळी केक कापून जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर,गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, जानवळे गावचे समाजसेवक संतोष मस्कर जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, विजय शिंदे, कोंढर काळसूर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, ज्येष्ठ मनसैनिक रमेश जोशी,उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी,गुहागर तालुक्यातील नामवंत उद्योजक विनोद पवार, जेष्ठ पत्रकार सत्यवान घाडे आदी. उपस्थित होते.सर्वांनी जानवळकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कामाची स्तुती केली दिवसभरात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यामध्ये गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, सचिव गणेश किर्वे,पाटपन्हाळे गावचे उपसरपंच आसीम साल्हे ,शृंगारतळीतील सामाजिक कार्यकर्ते उस्मान भाई अहमद भाई वडद गावचे सरपंच संदीप धनावडे, मुंढरचे सरपंच बबलू आग्रे अशा अनेक नामवंत व्यक्तींनी भेट देऊन शुभेच्छा दिली

राजकीय व सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप व फेसबुक माध्यमातून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...