???????? दुःखद बातमी
सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दिपक हळबे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अनिरुद्ध भक्त, तायक्वांदो ॲकॅडमीचे खजिनदार अशी होती ओळख
???? देवरूख (तालुका संगमेश्वर) – देवरूख सह्याद्रीनगर येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दिपक हळबे (वय ५९) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. शांत, मितभाषी स्वभाव आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागामुळे त्यांची स्वतंत्र ओळख होती.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातील कामे आटपून ते विश्रांती घेत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने चोडणकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हळबे हे अनिरुद्ध बापू यांचे निष्ठावान भक्त होते. त्यांचा सहभाग विविध क्षेत्रांत होता. ते संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमीचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या घरी भेट देत अंत्यदर्शन घेतले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
????️ दिपक हळबे यांना ‘रत्नागिरी वार्ताहर’कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
#दिपकहळबे #देवरूख #हृदयविकार #AniruddhaBapu #TykwondoAcademy #Sahyadrinagar #श्रद्धांजली #RatnagiriVartahar
???? फोटो