अंमली पदार्थविरोधी कारवाई : रत्नागिरी जिल्ह्यात ४ आरोपी अटकेत, २.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड आणि रत्नागिरी एमआयडीसीत पोलिसांची संयुक्त कारवाई; पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांची माहिती
रत्नागिरी : जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत खेड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३१ मे ते ३ जून दरम्यान चार वेगवेगळ्या कारवाया करून एकूण २ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड पोलिसांनी भरणे नाका आणि तुतारी एक्सप्रेसजवळ गस्तीदरम्यान तीन जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ किलो २२८ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३ जून रोजी रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गस्त घालून शफाकत हसन राजपूरकर (४०, रा. देवरुख) याला १० ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह अटक केली.
या चारही कारवायांमध्ये अंमली पदार्थांसह इतर साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक बगाटे यांनी सांगितले की, अंमली पदार्थविरोधी कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून, २०२४ मध्ये एनडीपीएस ॲक्टखाली ३ आरोपींना तडीपार करण्यात आले होते. तर २०२५ मध्ये आतापर्यंत ५ आरोपींना तडीपार करण्यात आले असून १२ आरोपींविरोधात तडीपारीचे प्रस्ताव संबंधित विभागांकडे पाठवण्यात आले आहेत.
—
???? #RatnagiriCrime #DrugBust #NDPSAct #KhEdPolice #LCB #SPNitinBagate #RatnagiriNews #GanjaSeizure #BrownHeroin #MaharashtraPolice
???? फोटो