पार्किंगशिवाय टोइंग व्हॅन पुन्हा सुरू; ठाणेकर संतप्त, शिवसेना (उबाठा) आक्रमक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पार्किंगशिवाय टोइंग व्हॅन पुन्हा सुरू; ठाणेकर संतप्त, शिवसेना (उबाठा) आक्रमक

ठाण्यात टोइंग व्हॅन पुन्हा सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं वाहतूक शाखेला निवेदन – “आधी पार्किंग सोया द्या, मग टोइंग करा”

ठाणे (वार्ताहर)  शहरात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोइंग व्हॅन सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शहरात पुरेशा पार्किंग सुविधांचा अभाव असताना टोइंग व्हॅन सुरू करून ठाणेकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र निषेध नोंदवला आहे.

“शहरात पार्किंगचं धोरण राबवायचं नाही आणि नागरिकांच्या गाड्या उचलून दंड आकारायचा हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे,” असा आरोप करत आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाठ यांना निवेदन देण्यात आलं.

या निवेदनप्रसंगी शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे शहर प्रमुख श्री. प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, रामभाऊ रेपाळे, परिवहन माजी सदस्य राजेंद्र महाडिक, प्रतीक राणे, प्रशांत सातपुते, विजय हंडोरे, रमेश शिर्के, संजय भोई, संजय भिसे, राजू मोरे, राजू शिरोडकर, विभाग समन्वयक प्रदीप वाघ, शाखाप्रमुख प्रवीण उतेकर, बाळू, उत्तम सूर्यवंशी, अनिल धुमाळ, कोशिनकर, संतोष डोंगरे हे उपस्थित होते.

तसेच महिला पदाधिकारी म्हणून उपजिल्हा प्रमुख आकांक्षा राणे, शहर संघटक प्रमिला भांगे, विधानसभा संघटक विद्या कदम, शहर प्रमुख अनिता प्रभू, तसेच सुनंदा देशपांडे, उषा बोराडे, सविता धुमाळ, सासिका सुनेदार, अपर्णा भोईर, पौर्णिमा लाड, आरती मोरे व इतर महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, “आधी शहरात पार्किंग व्यवस्था उपलब्ध करा, अन्यथा हे टोइंग व्हॅनचं नाटक सहन केलं जाणार नाही. जनआंदोलन उभारण्याची वेळ आली तर ती मागे हटणार नाही.”


???? हॅशटॅग्स:

#ThaneNews #ShivSenaUBT #ParkingPolicy #TowingVan #ThaneTraffic #RajanVichare #Mashal #SavethePlanet #MaharashtraPolitics #ThanekarSantantra


???? फोटो 


✍️ – रत्नागिरी वार्ताहर

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...