पर्यावरणदिनी कामोठे नवी मुंबई येथे अपंग, अंध नागरिक निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पर्यावरणदिनी कामोठे नवी मुंबई येथे अपंग, अंध नागरिक निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम

banner

नवी मुंबई (मंगेश जाधव)

05 जून (2025) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री सुनील करपे सरांच्या पुढाकाराने निसर्गप्रेमी संस्था व सहकारी यांच्या वतीने आदिनाथ अल्पईन बिल्डिंग समोर ,अक्षर बिल्डिंग (जिओ मॅट्रिक्स) जवळ सेक्टर 25 कामोठे नवी मुंबई येथे अंध, अपंग, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक ,महिला व इतर सर्व मान्यवर नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिवसेना कामोठे शहराध्यक्ष श्री सुनील भाई गोवारी, भाजप शहर उपाध्यक्ष श्री शरद राव जगताप, गुड मॉर्निंग ग्रुप सदस्य,भाजप नेते श्री सुरेश शेठ खरात व सहकारी ,शुभांगीताई खरात, कामोठे कॉलनी फोरमचे एडवोकेट श्री समाधान जी काशीद साहेब व सहकारी, श्री दादू निकाळजे साहेब ,श्री जयप्रकाश जगताप साहेब, एडवोकेट विनायकजी पांडे साहेब, श्री बाळकृष्ण शिंदे साहेब व त्यांचे सहकारी व इतर नागरिक असे या कार्यक्रमासाठी 200 ते 250 पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

श्री सुनील कर्पे सर हे वाशी, नेरूळ ,सीबीडी बेलापूर ,खारघर कामोठे ,आदई डोंगर पनवेल अशा ठिकाणी वर्षभर वृक्षारोपण तसेच त्यांना स्वतःच्या स्कुटीवर कॅनद्वारे पाणी घालण्याचे व संवर्धनाचे अविरत काम करत असतात. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ या सर्व ठिकाणी पाचशेच्या आसपास झाडे लावलेले आहेत. झाडे लावा झाडे जगवा.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...