“रमाईचं कुंकू” या काव्यसंग्रहाचे कवी व सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण पवार यांचा वरवेली गावाच्या वतीने सन्मान
नवी मुंबई (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील वरवेली बौद्धवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष ,सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, सम्यक कोकणकला संस्था गुहागरचे अध्यक्ष, रमाईचं कुंकू या काव्यसंग्रहाचे लेखक, ज्येष्ठ कवी बाळकृष्ण गोविंद पवार यांचा वरवेली ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
वरवेली ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, सेजल शिंदे, माजी सरपंच सुप्रिया देसाई, माजी उपसरपंच धनश्री चांदोरकर, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, जयसिंग शिंदे, प्रा.राधा शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड,अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे, प्रसाद विचारे , सायली करंदेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड यांनी केले. यावेळी बोलताना सरपंच नारायण आगरे यांनी सांगितले की, गावातील ज्येष्ठ कवी बाळकृष्ण पवार यांच्या लेखणीतून साकारलेले “रमाईचं कुंकू”या गीत संग्रहाचं नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला, वरवेली गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनेक रत्न या गावामध्ये आहेत. या सर्वांचाच भविष्यकाळात ग्रामपंचायतीच्या वतीने येथोचित गौरव करण्यात येईल. पवार यांनी काव्यसंग्रहाच्या माध्यमातून साहित्य व काव्य प्रांतात महत्त्वाचे योगदान दिले आहे, रमाईचं कुंकू हे काव्यसंग्रह सर्वांना स्फूर्ती देणारे ठरणार आहे. आणि या काव्यसंग्रहाचे सर्वांनी वाचन करून आत्मसात करावे, अशी विनंती त्यांनी शेवटी केली.