???? चव्हाणवाडीत पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी!
महिलांनी वडाची मनोभावे पूजा, फेर्या आणि एकमेकींना वाण देत सण साजरा केला
राजापूर (श्री. मनोहर धुरी):
राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी गावात वटपौर्णिमा सण मोठ्या पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील महिलांनी एकत्र येत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली.
यावेळी महिलांनी वडाला पुसमाला अर्पण करत वडाभोवती सात फेऱ्या मारल्या आणि दीर्घ सौभाग्याची प्रार्थना केली. पूजेनंतर एकमेकींच्या गळ्यात काळ्या मण्यांचे पोत बांधण्यात आले. त्यानंतर सर्व महिलांनी परस्परांना ‘वाण’ देत सणाची परंपरा जपली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. वटपौर्णिमेच्या निमित्ताने चव्हाणवाडीत अध्यात्म, नातेसंबंधांची नवी ऊर्जा आणि एकात्मतेचं वातावरण अनुभवायला मिळालं.
—
???? #वटपौर्णिमा #चव्हाणवाडी #राजापूर #रत्नागिरीबातम्या #महिला_सण #सौभाग्यव्रत
???? फोटो